पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वस्वी अधिकार पार्थ पवारच घेणार! ‘कात्रज’च्या राजीनाम्याने धोरण स्पष्टच! पक्षात निश्चित फॉर्म्युला राबविण्याची शक्यता….


जयदिप जाधव

उरुळीकांचन : दिवंगत नेते अजित पवार यांच्या पश्चात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागावर संपूर्ण प्रभुत्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाचे निर्णय घेण्याचे सर्व आधिकार आता राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी स्वतः हा आपल्याकडे ठेवले असून अजित पवार यांच्या पश्चात कात्रज दूध संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांचा तडकाफडकी राजीनामा त्यांनी घेऊ केल्याने आता जिल्ह्यातील सहकारी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवरील पदाधिकारी निवडीत पार्थ पवार हेच पक्षाचे पुढील नियंत्रण सांभाळणार असल्याचे निश्चित झाले असून संस्था पदाधिकारी बदलात त्यांनी निश्चित फॉर्म्युला ठरविला असल्याने पक्षातील अंतर्गत बदलाची सूत्रे निश्चित केल्याची चर्चा आहे.

कात्रज दूध संघातील संचालक मंडळाच्या अंतर्गत नाराजीनाट्याची चर्चा थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांच्यापुढे गेल्याने कात्रज दूध संघाच्या तालुकानिहाय एका संचालकाला अध्यक्षपद देण्याच्या अजित पवार यांनी तत्कालीन घेतलेल्या निर्णयाची आठवण कात्रजच्या संचालकांनी पार्थ पवार यांना करुन दिली आहे. या निर्णयानुसारच पार्थ पवार यांनी थेट स्वप्नील ढमढेरे यांंना राजीनामा देण्याचे फर्मान सोडल्याची चर्चा आहे.

पक्षात पक्षशिस्त व पक्षाशी एकनिष्ठतता असल्याचा मुद्द्यावर संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्याची चर्चा आहे. याच सुत्राने जिल्ह्यातील जिल्हा बँक, साखर कारखाने, बाजार समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांतील जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या नियुक्त्यांचा कालावधी त्यांनी ठरविला असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांशी वर्चस्व आहे. या संस्थांवर पदाधिकारी निवडीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस असताना अजित पवार यांचे नियंत्रण होते. आता त्यांच्या पश्चात जिल्ह्यातील पक्षाची सुत्रे कोणाकडे जाणार म्हणून पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर चर्चा सुरू होती. मात्र कात्रज दूध संघाच्या अध्यक्ष बदलाच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील पक्षाची सूत्रे पार्थ पवार यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करण करुन निश्चित कालावधी ठरवून भाकरी भिरविणार असल्याचे संकेत दिले आहेत.

धक्कादायक घडामोडींची शक्यता?

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीपासून ते पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी पार्थ पवार यांनी बेधडक निर्णय घेऊन ते चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहेत. २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आणण्यात तर २०२६ ला थलपती विजय यांचा तमिळनाडूत ऐतिहासिक विजय होईल अशी तंतोतंत भविष्यवानी करुन देशाच्या राजकीय वाऱ्याचा अंदाज ओळखणारे राजकीय रणणितीकार प्रशांत किशोर यांच्याकडे आता पक्षाची रणणितीकार म्हणून जबाबदारी दिली आहे. नरेश आरोरा यांच्याकडून जबाबदारी काढुन प्रशांत किशोर यांच्याकडे देण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्ष त्यांचीच रणणिती घेऊन पुढे जाणार आहे. ते १ जूनपासून पक्षाची राजकीय जबाबदारी स्विकारणार आहे. त्यामुळे राज्यात व पर्यायाने जिल्ह्यात पक्ष सक्षम नेतृत्वाला संधी देऊन अनपेक्षित निर्णय घेऊन धक्कादायक घडामोडी घडण्याचा शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!