महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती साठा शिल्लक? मंत्री छगन भुजबळांनी मांडले आकडे; ‘ही’ परिस्थिती असल्याचा खुलासा…


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोन्याची खरेदी कमी करण्यासह पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केल्यानंतर देशभरात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया देत नागरिकांनी काटकसरीचे धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

भुजबळ म्हणाले की, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. ही परिस्थिती आपण निर्माण केलेली नसून, जगातील पेट्रोलवर अवलंबून असलेल्या देशांमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे इंधनाचा वापर जपून करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी हॉटेल्स आणि इतर ठिकाणी निर्बंध होते, ते हळूहळू शिथिल करण्यात आले. मात्र आता पुन्हा परिस्थिती पाहता सर्वांनी संसाधनांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

होर्मूजच्या सामुद्रधुनीत सुरू असलेल्या परिस्थितीवर पुढील घडामोडी अवलंबून असल्याचे सांगत, तेथील तणाव कमी झाल्यास मोठ्या अडचणी उद्भवणार नाहीत, असे भुजबळ यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी दिलेला संदेश हा सर्व नागरिकांसाठी असल्याचे सांगत त्यांनी काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचे आवाहन केले.

दरम्यान, राज्यातील इंधनसाठ्याबाबतची माहिती देताना भुजबळ यांनी सांगितले की, सध्या राज्यात पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक तेवढाच वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!