मनोज जरांगे वापरत असलेली 2 कोटींची गाडी कोणाची? राज्यभर चर्चा सुरू होताच जरांगे पाटील यांनी सगळंच सांगून टाकलं…


सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चर्चेत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते सरकारवर टीका करत आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी आता त्यांनी शेवटचे आंदोलन असल्याचे सांगत पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. असे असताना त्यांच्या ताफ्यातील आलिशान गाडी चर्चेचा विषय ठरत आहे.

मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रा दौऱ्यात वापरत असलेली डिफेंडर कार अनेकांच्या नजरेत पडत आहे. मनोज जरांगे पाटील वापरत असलेली इतकी महागडी कार कोणाची आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.या डिफेंडर कारबाबत मनोज जरांगे यांनी;सांगितले की, ती डिफेंडर गाडी माझी नाही, माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाही.

एका कार्यकर्त्याने मला त्याचे नाव माहिती नाही, त्याने ही डिफेंडर कार मला वापरायला दिली आहे. त्याने मला सांगितलं की, मला देवाने भरपूर दिले आहे. तो म्हणाला की, पाटील तुम्ही माझ्या गाडीत बसा. त्यामुळे मी ही गाडी घेऊन दौऱ्यात आलो, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. माझा समाज मोठ्या मनाचा आहे.

माझा समाज म्हणतो, बसा गाडीत, मी बसतो, माझा समाज माझ्यावर जीव लावतो. या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. अनेक पोरं त्या गाडीला लटकतात. मी समाजाचे काम करतो, समाजाला मायबाप मानलं आहे. माझ्या समाजातल्या लोकांनी एखादी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असे म्हणतात, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, सध्या मनोज जरांगे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. यांच्या डिफेंडर कारवर सांगलीत जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या मराठा आंदोलनावरून जरांगे सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!