दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा; हजारो कोटींचं अनुदान मंजूर


मुंबई : राज्यासह देशातील शेतकरी यंदा दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत आता रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारकडून एकूण 62 हजार 370 कोटी रुपयांचे खत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खतांच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, डीएपी खताची 50 किलोची गोणी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच 1 हजार 350 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

यंदाच्या खत अनुदानाच्या बजेटमध्ये तब्बल 24 हजार 418 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खत खरेदी करताना आर्थिक मदत मिळणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याने पावसाच्या वितरणात मोठी अनियमितता पाहायला मिळाली. जूनच्या शेवटच्या दोन आठवड्यांत आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने मोठी दडी मारली. परिणामी, पाण्याअभावी उभी पिके वाळून गेली आणि खरीप हंगामातील उत्पादनाला मोठा फटका बसला.

शेतकऱ्यांना पाच हजारांची आगाऊ मदत

खरीप हंगामातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आगाऊ मदत म्हणून पाच हजार रुपये देण्यात आले आहेत. आता केंद्र सरकारने खत अनुदानाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!