वाहनचालकांनो लक्ष द्या! ‘कनेक्टिंग लिंक’वर बुधवारी 3 तास वाहतूक बंद…


पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’च्या पुणे ते मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत देखभाल-दुरुस्तीचे काम तसेच मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत कनेक्टिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.

वाहनचालकांनी नियोजित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीदरम्यान काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाशी ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!