सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा दिला राजीनामा; कायद्यानुसार कोणता नियम लागू होतो? सविस्तर जाणून घ्या…


मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्या बारामती मतदारसंघातून विजयी झाल्या असून, आता त्या महाराष्ट्र विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत जाऊन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा अधिकृतपणे सादर केला.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्या राज्यसभेचा राजीनामा कधी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक दिवस चर्चा सुरू होती. मात्र, यामागे कायदेशीर नियम स्पष्ट आहे. ‘लोकप्रतिनिधी कायदा, १९५१’ नुसार जर एखादी व्यक्ती एका सभागृहाची सदस्य असताना दुसऱ्या सभागृहात निवडून आली, तर निकाल जाहीर

झाल्यापासून १४ दिवसांच्या आत तिने एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक असते. अन्यथा तिचे आधीचे सदस्यत्व आपोआप रद्द होऊ शकते. हा कायदा निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये उमेदवारांची पात्रता, अपात्रता, निवडणूक गुन्हे तसेच निवडणूक वादांचे निराकरण यासंबंधीचे नियम स्पष्ट केलेले आहेत.

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. आता या रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेसाठी कोणाला संधी दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!