मोठी अपडेट! शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ‘या’ कागदपत्राचे तातडीने प्रमाणीकरण करणे बंधनकारक


पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर मदत दिली जाणार आहे.

या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली असून, यामुळे राज्यातील सुमारे ३५ ते ४० लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंदाजानुसार, या योजनेअंतर्गत सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचे जवळपास १,४०० कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कर्जमाफीसाठी निकष काय?

या योजनेचा लाभ ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जांवर लागू होणार आहे. काही विशेष प्रकरणांमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित कर्जांचा कालावधी ३० जून २०२६ पर्यंत ग्राह्य धरला जाऊ शकतो. ही योजना मुख्यतः थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी असून नियमित कर्जदारांना स्वतंत्र अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणारा लाभ

थकीत कर्जदार : २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
नियमित कर्जदार : ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान
आधार प्रमाणीकरण बंधनकारक

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा आयरीस स्कॅनद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

फार्मर आयडी आवश्यक

अॅग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ तयार करणे आवश्यक असून, केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!