पुरातून वाहन घालण्याचे धाडस जीवावर बेतले; कोरेगावमूळ बंधाऱ्यावरून शेतकरी दुचाकीसह पुरात वाहून गेले


उरुळी कांचन : कोल्हापूर बंधाऱ्यावरुन पुराचे पाणी वाहत असताना पुल ओलंडण्याचे धैर्यिष्ठ शेतकऱ्याला महागात पडले असून शेतकरी वाहनासहीत पुलावरुन वाहून गेल्याची घटना कोरेगावमूळ (ता.हवेली)येथील मुळामुठा नदीच्या बंधाऱ्यावर घडली आहे. सोमवार (दि.३) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घटना घडली असून अग्निशामक दल व जिल्हा व्यवस्थापन पथकाला रात्रीउशिरापर्यंत पुरात वाहून गेलेले शेतकऱ्याचा शोध अद्याप लागला नाही.

गंगाधर साहेबराव गोते(वय ६२ रा. बिवरी, ता.हवेली) असे मुळामुठा नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते कोरेगावमूळ येथील कोल्हापूर बंधाऱ्याच्या पुलावरून दुचाकीने पुल ओलंडण्याचे धाडस करीत होते. परंतु पाण्याचा अधिकच असल्याने ते दुचाकीसह पुलावरुन वाहून गेले आहेत.

बंधाऱ्यावरून वेगाने सुमारे फुटभर पाणी वाहत असताना आपली दुचाकी या पुराच्या प्रवाहात घातली व तोल जावून ते नदीपात्रात पडून ते पाण्यात वाहून गेले आहेत.

त्यांचा पुरात वाहून गेल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर घटनेचा उलगडा होऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी केला आहे. परंतु त्यात त्यांना यश न मिळाल्याने अग्निशमक दल व जिल्हा व्यवस्थापन पथक यांनी शोधमोहीम राबविली आहे. मात्र त्यांना अद्याप यश मिळाले नाही

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!