देशासाठी प्राणार्पण! कोल्हापूरच्या जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण…


कोल्हापूर : महाराष्ट्राचे सुपुत्र जवान रोहित परशुराम खन्नीकुडे (वय २७, रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हे जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री झालेल्या अपघातात हुतात्मा झाले.

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये २०२० साली भरती झालेल्या रोहित यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांनी बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीत भरती होऊन प्रशिक्षण पूर्ण केले होते.

सैन्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी अरुणाचल प्रदेश तसेच चीन सीमेवरही कर्तव्य बजावले होते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सेवेत असताना झालेल्या अपघातात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

रोहित यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. वडील परशुराम हे शेतकरी असून आई गृहिणी आहेत. मुलगा गमावल्याचे दुःख असले तरी देशासाठी प्राणार्पण केल्याचा अभिमान असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

रोहित खन्नीकुडे यांच्या निधनाची बातमी समजताच टाकळीवाडी गावावर शोककळा पसरली आहे. जम्मू-काश्मीरमधून त्यांचे पार्थिव गावी आणण्यासाठी रवाना झाले असून रविवारी ते टाकळीवाडीत दाखल होणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रोहित यांच्या बलिदानामुळे कोल्हापूरच्या मातीतून देशासाठी दिले जाणारे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!