मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला, पवारच राहणार अध्यक्ष

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदापासून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. थांबायची वेळ आली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

असे असताना आता निवड समितीने त्यांचा राजीनामा फेटाळला असून कार्यकर्त्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आता पवारच पुन्हा एकदा अध्यक्ष राहणार असल्याचे सांगितले गेले होते. यामुळे अनेकांनी उपोषण देखील केले होते.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत प्रस्ताव मांडला होता. पवार म्हणाले होते की, गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले होते. यावेळी मोठा राडा झाला होता.

यामुळे आता नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता पवारच अध्यक्ष राहणार आहेत. यामुळे आता अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.