बारामतीच ‘मैदान’ कोण मारणार? सुनेत्रा पवारांच्या विरोधात 19 उमेदवार रिंगणात,संपूर्ण यादी समोर..


बारामती : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या असून आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 19 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.अपक्ष आणि विविध पक्षांचे उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बारामतीच मैदान कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत कुणी कुणी केला अर्ज? संपूर्ण यादी

सतिश कदम ( हिंदुस्तान जनता पार्टी ),सागर भिसे ( अपक्ष ), अभिजीत बिचुकले ( अपक्ष ),राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ),गजानन गवळी ( अपक्ष ),त्रिशाला कांबळे ( अपक्ष ),दिलीप अळोणी ( अपक्ष ),दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष ),अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी ),सागर भिसे ( अपक्ष ),रजाक मुलाणी ( अपक्ष ),संदीप खरात ( अपक्ष ),विलास होळकर ( अपक्ष, बारामती ),दादा थोरात ( अपक्ष, बारामती ),अभिजीत कांबळे ( अपक्ष, बारामती ),मिथून आटोळे ( अपक्ष, बारामती ),अभिजीत बिचुकले ( अपक्ष ),अनिल तुपे ( अपक्ष ),संकेत गावडे ( अपक्ष, बारामती )

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रत्यक्ष मैदानात मात्र सुनेत्रा पवार यांच्यासमोर अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचा मोठा फौजफाटा उभा राहिला आहे. अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आतापर्यंत 19 जणांनी आपले नामांकन दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.

दरम्यान महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेसकडूनही उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास ही लढत तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 6 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरतील. आता या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!