विकृतीचा कळस!पुण्यात 7 वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाकडून अत्याचार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेपासून महिलांच्या आणि मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनात वाढच होताना दिसत आहे. अशातच आता पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात एका 7 वर्षाच्या चिमुकलीवर 40 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने पीडित मुलीला,आपल्या खोलीत बोलावून घेऊन तिच्यावर 2 एप्रिलला लैंगिक अत्याचार केले. तसेच कोणालाही सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली. पुन्हा दुसऱ्या दिवशी देखील म्हणजे 3 एप्रिलला सकाळी पुन्हा आरोपीने पीडितेला आपल्या खोलीत बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आपल्या मुलीसोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
मोशी येथील विनायकनगर, शिवशंभो कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात फिर्यादीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून 40 वर्षीय व्यक्तीने या आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे,. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम 64 (1), 65 (2), 74,351 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सोच्या अंतर्गत कलम 4,6,8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.