गेट-टुगेदरची पार्टी ठरली अखेरची! कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत..


पुणे : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात गेट-टुगेदरला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला पडला आहे. या कुटुंबाची कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने एकाच घरातील नऊ जण ठार झाले आहेत.या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका आणि इंदोरे गावात शोककळा पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री साडे दहाच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेलं दरगोडे कटुंब खासगी क्लासच्या गेट टुगेदर पार्टीला आलं होतं. याठिकाणी पार्टी आटोपून घरी दरगोडे कुटुंब कारने आपल्या घरी जात होत. दरम्यान, शिवाजीनगर परिसरातून जात असताना त्यांची कार राजेंद्र राजे यांच्या विहिरीत जाऊन कोसळली. यात विद्यार्थी आणि पालक असे एकूण 9 जण ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान मध्ये रात्री विहिरीत असणारा अंधार आणि खोल पाणी असल्यामुळे बचाव कार्य करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी दोन हायड्रा क्रेन आणि गावातील पोहणाऱ्या व्यक्तींना बोलवून बचावकार्य केलं. रात्री सव्वा बाराच्या सुमारास क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान सर्व मृतदेह लोकांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढून शासकीय रुग्णालय दिंडोरी येथे आणले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली जात आहे. गेट टुगेदरला गेलेल्या एकाच कुटुंबातील नऊ जणांचा अशाप्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!