उच्च न्यायालयाची जातनिहाय जनगणनेला अंतरिम स्थगिती, सरकारला मोठा झटका

पटणा: बिहार सरकारला मोठा झटका बसला आहे. याचे कारण म्हणजे पाटणा उच्च न्यायालयाने जातनिहाय जनगणनेला अंतरिम स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचा हा अंतरिम निर्णय असून याप्रकरणी अंतिम निर्णय येणे बाकी आहे.
असे असताना आता हायकोर्टात आता ३ जुलै रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की बिहार सरकार सर्वेक्षणाचा कोणताही डेटा आत्ताच जाहीर करू शकत नाही. यामुळे आता अंतिम निकाल जाहीर होण्याची वाट बघावी लागणार आहे.
सरन्यायाधीश व्ही चंद्रन यांच्या खंडपीठाने आपला अंतरिम निकाल देताना जात जनगणनेवर तात्काळ बंदी घातली आहे. यासोबतच आर्थिक सर्वेक्षणावरही बंदी घालण्यात आली आहे.
तसेच जातनिहाय जनगणनेअंतर्गत आतापर्यंत गोळा केलेला डेटा शेअर करण्यास आणि वापरण्यासही न्यायालयाने बंदी घातली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Views:
[jp_post_view]