महाराष्ट्रात राजकीय भूकंप!25-30 आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण होणार? राऊतांचा बॉम्बस्फोट..

पुणे : उपमु्ख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या लेटर बॉम्बनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवल्यानंतर आता राजकीय भूंकप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडी,दरम्यान राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येत असून राष्ट्रवादी काँग्रेस आता 25-30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल,असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे अजित पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बुधवारी मध्यरात्री दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत.त्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भविष्यात 25 ते 30 आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन होईल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजरमध्ये विलीन व्हावेच लागेल, असा दावा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी आहेत, ते आता सुनेत्रा पवारांचे सहकारी नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदलावरून वातावरण तापले आहे. कार्याध्यक्षाला अध्यक्षासारखे अधिकार बहाल करण्याचा मुद्दा वादाचे कारण ठरत आहे. यावरून पक्षातील वरिष्ठांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण होणार आहे.

दरम्यान अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत,असे पत्र पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते.मात्र या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला हे सर्व पत्र व्यवहार अमान्य समजावेत, असं पत्राद्वारे कळवलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे दिसून येत आहे.