मोठी बातमी! देशात पुन्हा लॉकडाऊन? केंद्रीय मंत्र्यांनी केलं चित्र स्पष्ट, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सध्या सगळीकडे अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीमुळे भारतात गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर रांगा लांबल्याचे पाहायला मिळत आहे.

यामुळे अडचण निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल लवकरच संपतील, असे म्हटले जात आहे. अनेक अफवा सध्या जोर धरून आहेत. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स आणि गॅसवर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसायही बंद झाले आहेत. यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिक आता पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत तक्रारी करत आहेत. असे असताना देशात लॉकडाऊन लागू होईल या चर्चा सुरू असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, सरकार प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

तसेच नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आणि लॉकडाऊन लागू होणार नाही असं देखील हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठ्याची देखरेख केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असेही त्यांनी सांगितले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक तेवढाच उपयोग करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे आता लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी नागरिक काहीसे भीतीच्या वातावरणात असून याबाबत अनेकांना विश्वास बसत नसल्याचे सांगितले जात आहे.