भाजपच्या नगरसेवकांना मोठा धक्का! अपत्याबाबतची ‘ती’ माहिती लपवण भोवलं, पद हातातून जाणार..


मुंबई : महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक भरत भोईर यांच्यावर तिसऱ्या अपत्याबाबत नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भाजपचे नगरसेवक भरत भोईर यांच्या विरोधात तुर्भे येथील सविता देवीदास लगाडे यांनी बेलापूर येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.याचिकेनुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १० (१) (ज) अंतर्गत ‘दोन अपत्य नियम’ लागू आहे. लगाडे यांनी दावा केला आहे की, भोईर यांना १७ फेब्रुवारी २००२ रोजी तिसरे अपत्य झाले, जे कायद्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या १२ सप्टेंबर २००१ या अंतिम मुदतीनंतरचे आहे. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

त्या दाव्याच्या समर्थनार्थ रुग्णालयातील नोंदी, जन्मनोंदणी रजिस्टर तसेच महापालिकेचे अधिकृत अभिलेख सादर करण्यात आले आहेत. मात्र, भोईर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार संबंधित अपत्याचा जन्मदिनांक १० मे २००१ असा दाखवण्यात आला आहे, जो कायदेशीर मुदतीपूर्वीचा आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व पुराव्यामध्ये छेडछाड होण्याची शक्यता विचारात घेत न्यायालयाने एकतर्फी अंतरिम दिलासा दिला आहे.त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना मूळ जन्मनोंदी सील करून सुरक्षित ठेवण्याचे तसेच जन्मनोंदणी रजिस्टर आणि संगणकीय नोंदी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!