मी साक्षात शंकर तू माझी पार्वती; गोड बोलून पुण्यातील महिलेला लॉजमध्ये नेलं अन्…; खरातनंतर वसईतील बाबाचा भिंग फुटलं


पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. पुण्यातील एका 35 वर्षीय महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे वसईतील भोंदू बाबाचं भिंग फुटल आहे.‘मी साक्षात शंकर, तू माझी पार्वती, असं म्हणत महिलेला आपल्या जाळ्यात ओढत तिच्यावर या स्वयंघोषित गुरूनं अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य अस त्या भोंदू बाबाचे नाव आहे. त्याने पिडीतेची ओळख 2023 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मिळवली होती. महिलेच्या धार्मिक ओढीचा गैरफायदा घेत ऋषिकेशने तिला अध्यात्म शिकवण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला आणि मांजरी येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्यानंतर तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचवेळी अश्लील फोटो काढले आणि त्याआधारे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने धाडस करून आपल्या पतीला हा सर्व प्रकार सांगितला.
ऋषिकेश वैद्य या नराधामाचे पितळ उघडे पडले.याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. आणखीन एक भोंदू बाबाचे प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!