खरात प्रकरणावरून वातावरण तापलं! सोमवती अमावस्येच्या दिवशी रूपाली चाकणकर कुठे होत्या? आरोपांना थेट प्रत्युत्तर…

नाशिक : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले जात होते. त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत आरोपांना थेट प्रत्युत्तर दिल आहे.

रूपाली चाकणकर यांनी असं म्हटलं आहे की, गेल्या दोन दिवसापासून ज्या गोष्टी चालू आहेत त्या चुकीच्या आहेत. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो. पाद्यपूजेचे जे फोटो आहेत ते अनेक वर्षांपूर्वीचे आहेत. अनेक लोकांचे फोटो यामध्ये आहेत. पण फक्त महिला म्हणून मला जी टार्गेट केलं जात आहे ते अत्यंत चुकीच आहे. कोणीतरी 2 सप्टेंबरचा फोटो दाखवला, पण तो 12 सप्टेंबरचा आहे. 2 सप्टेंबरला मी अजितदादांच्या दौऱ्यात होते असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
याआधी सुषमा अंधारे यांनी वशीकरणाची विद्या शिकण्यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका कापली होती, असा आरोप त्यांच्यावर केला होता. सुषमा अंधारे यांच्या आरोपाला रुपाली चाकणकर यांनी उत्तर देत त्या २ सप्टेंबरच्या दिवशी कुठे होत्या हे सांगितले.

तसेच सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांनी अमावस्येच्या दिवशी अनामिका कापल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. त्यावर उत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करेल असे सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘माझ्या हाताला कुठेही जखम नव्हती. खोटे नरेटिव्ह सेट करणाऱ्यांच्या विरोधात कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल असे त्यांनी स्पष्ट म्हटलं.
त्या म्हणाल्या,जे काही कृत्य घडलंय ते अत्यंत चुकीचं आणि घाणेरडं आहे. त्याचे आम्ही कुठेही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्याचा तपास करुन आरोपीवर कठोर कारवाई करावी. पण एक महिला म्हणून माझ्यावर जे आरोप केले जात आहेत ते खूपच वाईट आहेत. असे चाकणकर यांनी म्हटले आहे.