आतिक अहमदच्या सहकाऱ्याचा ठिकाणा अखेर सापडलाच, पोलीस यंत्रणा मार्गावर


लखनौ :  उत्तर प्रदेशातील गँगस्टर व प्रयागराज येथे मारला गेलेला गुंड आतिक अहमदबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या पोलीस त्याच्या पूर्ण गॅंगला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता त्याचा सहकारी गुड्डू मुस्लीम हा गोव्यात लपल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यामुळे गोव्याची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. गुड्डू मुस्लीम हा आतिक अहमद याचा सहकारी असून प्रयागराजमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.

आतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना ठार मारण्यात आले आहे. आतिक अहमदची पत्नी
शाईस्ता परवीन ही सध्या फरारी आहे. तिचा देखील पोलीस तपास करत आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वी बॉम्बफेक केल्याप्रकरणी गुड्डू मुस्लीम याचा पोलीस शोध घेत आहेत. गुड्डू हा गोव्यात लपला असल्याचे वृत्त वृत्तवाहिनीने दिले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे पोलीस गोव्यात येणार असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गोवा पोलीस सतर्क झाली आहे.

यामुळे कोणत्याही क्षणी पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात.
दरम्यान, यापूर्वीही गोव्यात अनेक गुन्हेगार लपल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या भीतीने गुड्डू मुस्लीम गोव्यात येऊन लपण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सध्या यंत्रणा कामाला लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!