खाद्यपदार्थ महाग, भजी, वडापाव ते शेगाव कचोरीपर्यंत…गॅस टंचाईमुळे गणित बिघडलं, युद्धाचे मोठे परिणाम…

नवी दिल्ली : देशात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातल्या नागरिकांना. युद्धाचा परिणाम फक्त जीवितहानी, विध्वंसापुरताच मर्यादित नाहीये, तर या तिन्ही देशांमुळे भारतासह इतर अनेक देश होरपळत आहेत.

भारत गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस टंचाई जाणवत असून त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत आणखी वाढझाली आहे. गावं असो की शहर, बहुतांश ठिकाणी लोक सकाळपासून ते दुपारच्या कडाक्याच्या उन्हापर्यंत, सिलिंडर मिळवण्यासाठी रांगेत तासनतास उभे असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून बंद आहे.
त्यातच काही ठिकाणी आता खाण्याच्या पदार्थाच्या किंमती वाढू लागल्या आहेत. काही ठिकाणी वडापा, भजीपाव, समोसा यांच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच गॅस टंचाईचा फटका जगप्रसिद्ध शेगाव कचोरीलाही बसला असून टंचाईमपळे आता शेगाव कचोरीचे भावही वाढल्याचे दिसत आहे.

ठाण्यात वडापाव पाच रुपयांनी महागला आहे. गॅस सिलेंडर , बेसन आणि तेलाच्या वाढत्या किमतीमुळे वडापावचे दर वाढले आहे. सर्वसामान्यांना परवडणारा, पटकन पोट भरतं अशी खरंतर वडापावची ख्याति, मात्र टंचाईच्या झळा वडापावालाही बसत असून हा वडापाव महागल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. एवढंच नव्हे तर आता वडापाव सोबत समोसा पाव, कांदा भजी, बटाटा भजी यांच्या दरांमध्येही वाढ झाली आहे.
दरम्यान, मुंबईत 35 टक्के हॉटेल्स बंद झाली आहेत. व्यावसायिक सिलेंडर पुरवठ्यावर निर्बंध आणखी गॅस मिळत नाहीये, त्याच्या परिणामीच हे घडताना दिसत आहे. आधी मेन्यू कमी केले, पण हळूहळू काही हॉटेल्स बंदच करण्यात आली. येत्या बुधवारपर्यंत हॉटेल बंद होण्याचं प्रमाण 75 टक्क्यांपर्यत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहत ते श्री संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि तिथली सुप्रसिद्ध अशी कचोरी. देशातील कुठलाही भाविक शेगावला गेल्यानंतर संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेगाव येथील खमंग, कुरकुरीत अशा कचोरीचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. मात्र आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे याचा फटका आता शेगाव कचोरीलाही बसला आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेगाव येथील कचोरीचे ही भाव वाढले आहेत. गेल्या आठवड्यात शेगाव कचोरी दहा रुपयाला मिळत होती, ती आता दोन रुपयांनी वाढून बारा रुपयाला झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने ही भाववाढ केल्याचं बोललं जात आहे. पण याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य खवय्यांना बसत असल्याचे समोर येत आहे.