एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा 171 रुपयांची घसरण


पुणे : मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. ही घसरण 171 रुपयांची झाली आहे.

मागील महिन्यात देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण झाली आहे. परंतु हे लक्षात घ्या की ही घसरण फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीवर झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

तेल कंपन्यांच्या मते, देशातील 4 महानगरांमध्ये ही कपात 171.50 रुपये इतकी आहे. देशात एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू केले आहेत. नवीन दर जाहीर झाल्यानंतर आता राजधानी दिल्ली येथे 19 किलोचा गॅस सिलिंडर 2028 रुपयांऐवजी 1856.50 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती आता मुंबई येथे 1980 रुपयांऐवजी 1808.50 रुपये झाल्या आहेत. मार्चमध्ये तेल कंपन्यांकडून एका झटक्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 350 रुपयांनी वाढवण्यात आली होती.

त्यानंतर एप्रिल महिन्यात 92 रुपयांनी कपात केली असून आता मे महिन्यात पुन्हा एकदा व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे दिलासा मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!