‘माझ्या मुलाला परत आणा…. ; मराठी अभिनेत्रीची पंतप्रधानासह मुख्यमंत्र्यांना आर्त विनंती, युद्धाचा भडका वाढणार?


पुणे : इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्याचे पडसाद आता इतर देशावरही उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील अनेक नागरिक देखील दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत.पण, त्यासोबतच कुवेतमध्येही काही भारतीय अडकल्याची माहिती मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक व्हिडीओ शेअर करुन दिली आहे. ज्यामध्ये आपला मुलगा कुवेतमध्ये अडकला असल्याच तिने सांगितल आहे.आपल्या मुलाला परत भारतात आणण्यासाठी तिने पंतप्रधानासह मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदार हिचा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमधील एका हॉटेलमध्ये आहे. अशातच अभिनेत्रीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. कृपया मला मदत करावी. माझा मुलगा अभिनय कुवेतमध्ये अडकला आहे. #IndiaGovernment #NarendraModi #DevendraFadnavis देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, राज साहेब… कृपया मदत करावी…”, असं अभिनेत्रीने कॅप्शन लिहिलं आहे.

दरम्यान इस्त्राईल आणि इराणच्या युद्धात संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी आता महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सरकारकडून विशेष विमाने सुद्धा पाठवण्यात आले आहेत. या युद्धादरम्यान आता अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेत मधील हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्रीच्या मुलग्याचा विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलेलं आणि सध्या गेल्या चार दिवसांपासून तो कुवेतमध्येच अडकला आहे. तिथली परिस्थिती गंभीर झाली असून त्याला भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती विशाखा सुभेदार यांनी केली आहे. भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आमच्या मुलांची काळजी घ्यावी, ही विनंती सरकारला करतेय. लवकरात लवकर मार्ग काढावा…” असं त्यांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!