मार्चमध्ये तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद ; नागरिकांची गैरसोय होणार? कधी असणार सुट्टी..


पुणे : रिझर्व बँकेच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने बँकिंग कामासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या मार्च महिन्यात आता तब्बल बारा दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सुट्ट्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.

मार्च महिन्यामध्ये विविध सण उत्सव असल्याकारणाने बँकेचे व्यवहार देखील बंद राहणार आहे.यामध्ये होळी , गुढीपाडवा, रमजान यांसारख्या मोठ्या सण उत्सवांचा समावेश आहे. साप्ताहिक सुट्टयांमुळे एकूण 12 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. सलग सुट्टया आल्यामुळे आर्थिक व्यवहार रखडण्याची शक्यता असून, चेक क्लिअरन्स, नवीन खाते उघडणे आणि इतर बँक व्यवहारांसाठी नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

या महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांची यादी

१ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
३ मार्च होळी (धूलिवंदन)
८ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१४ मार्च दुसरा शनिवार
१५ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१९ मार्च गुढीपाडवा
२१ मार्च रमजान ईद
२२ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२६ मार्च श्रीराम नवमी
२८ मार्च चौथा शनिवार
२९ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी)
३१ मार्च महावीर जयंती

मार्च महिन्यात कर भरणा, गुंतवणूक आणि बँकिंग कामांसाठी मोठी गर्दी असते. अशातच 12 दिवस बँका बंद राहणार असल्याने व्यापाऱ्यांची अडचण होणार आहे. रोकड जमा करणे आणि धनादेश वटवणे यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!