नरेंद्र मोदी-शहांनी केजरीवालांची माफी मागितली पाहिजे!! निर्दोष मुक्तता झाल्यानंतर देशभरातून टीका…

नवी दिल्ली : दिल्लीतल्या बहुचर्चित मद्य घोटाळ्याच्या आरोपात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यांच्यासोबत मनीष सिसोदिया देखील तुरुंगात होते. अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळ्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.

आता अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायलयाने सीबीआयल झापलंही. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकरावर जोरदार टीकास्त्र सोडलं. मोदी-शहांनी केजरीवालांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर २३ जण , या सगळ्यांना सीबीआयने दिल्ली सरकारच्या मद्य पॉलिसीत घोटाळा झाला या आरोपाखाली अटक केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना(केजरीवाल) जवळजवळ फरपटत घेऊन गेले, हे संपूर्ण देशाने पाहिल.
पंतप्रधान मोदी, अमित शाह, तत्कालिन नायब राज्यपाल, य़ा सगळ्यांनी प्रचंड बदनामीची मोहीम चालवली. मद्य पॉलिसीत कोणताही गैरप्रकार झालेला नाही असं केजरीवाल सांगत होते. तरीही आधी लोकभा निवडणुका आल्या, जागा जिंकण्यासाठी केजरीवालांना तुरूंगात टाकलं. मग विधानसभा जिंकायची म्हणून त्यांनी हा विषय लावून धरला, असं राऊत म्हणाले.
पण काल न्यायलयाने सांगितले, ही संपूर्ण केस इतकी पोकळ आहे की ती टिकूच शकणार नाही. कोणताही पुरावा नाही, योग्य माहिती नाही, ही केस चालणंच शक्य नाही, उभी राहणं शक्य नाही असं सांगत या सर्वांची जवळजवळ निर्दोष मुक्तता केली. हेमंत सोरेन यांनाही मुख्यमंत्री असताना अशाप्रकारे अटक केली. महाराष्ट्रात अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना जावं लागलं. नवाब मलिक मंत्री होते, त्यांनाही जाव लागलं, मलाही तुरूंगात जावं लागलं, अस राऊतांनी सांगितलं.
प्रत्येकाला कोर्टाने शेवटी सोडलं. कोणी जामिनावर सुटलं, कोणी निर्दोष झाले. काहींच्य़ अटका या बेकायदेशीर आहेत, असं ईडी कोर्टाने सांगितलं. पण कालचं चित्र जे होतं, ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना चपराक मारणारं होतं, असं राऊतांनी सुनावलं.
केजरीवालांच्या भ्रष्टाचारावर सर्वात जास्त आवाज, प्रचारामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी उठवला. लोकसभा जिंकायच्या होत्या, म्हणून त्यांना तुरूंगात टाकलं. दिल्लीची विधानसभा त्यांच्याकडून काढून घ्यायची होती, म्हणून त्यांना केजरीवलांना तुरूंगात टाकायचं होतं, हे काल सिद्ध झाले आहे असे राऊत म्हणाले.
पुरावे नसताना, ज्या सीबीआय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे केजरीवाल आणि त्यांच्या लोकांना अटक करून तुरूंगात टाकलं. सरकारने, गृहमंत्रालयाने त्या सीबीआय अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, निलंबन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर खटले चालवले पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली.
नरेंद्र मोदी आणि शहांनी केजरीवाल यांची माफी मागितली पाहिजे…
केजरीवाल यांच्यावर पंतप्रधान मोदी आणि शहांनी आरोप केले. त्या दबावामुळे सीबीआयने कारवाई केली . त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आणि शहांनी केजरीवाल यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणीती राऊत यांनी केली.