अजितदादांचा घातपात असल्याचा संशय?बारामतीत पहिली ठिणगी; आज ‘हे’ अख्खं गाव बंद


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले जात असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील हा केवळ अपघात नसून तो एक ‘नियोजित घातपात’ असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. या दाव्यानंतर बारामतीत मोठी ठिणगी पडली असून,लोणी भापकर गावाने आज (22 फेब्रुवारी) ‘गाव बंद’ची हाक दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी यासाठी आता जनतेतून ही संताप व्यक्त केला जात आहे.अजितदादांच्या निधनाचे वृत्त पचवणे बारामतीकरांसाठी आजही कठीण जात आहे.आमच्या नेत्याचा मृत्यू नैसर्गिक नाही, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे लोणी भापकर ग्रामस्थांनी आज रविवारी सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी पोलिसांना दिले आहे.

आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघात संदर्भात सलग तीन पत्रकार परिषदा घेऊन या अपघातावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्या कंपनीचे विमान अपघातात पडले, त्या कंपनीचे बड्या नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.वैमानिक सुमित कपूर याच्या माध्यमातून हा घातपात घडवून आणला असावा, असा खळबळजनक संशय रोहित पवारांनी व्यक्त केला.

या सर्व प्रकरणानंतर आता त्यांच्या विमानअपघाताची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे. अशी मागणी आता ग्रामस्तरातून होत आहे. सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!