जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; पुणे जिल्ह्यात 29 लाखाहून अधिक मतदार बजावणार हक्क..


पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 करिता 7 फेब्रुवारी म्हणजे उद्या मतदान होणार आहे. तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे जिल्ह्यात 29 लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या 73 गट व पंचायत समितीच्या 146 गणाकरिता शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 असून मतदानापुर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बारामती तालुक्यात 299 , मावळ 243, मुळशी 227,शिरुर 337, हवेली 263,दौंड 317, इंदापूर 400,पुरंदर 235,भोर 237, वेल्हे 105, आंबेगाव 239,जुन्नर 366 आणि खेड 337तालुक्यात असे एकूण 3 हजार 605 मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 13 आदर्श व महिला मतदान केंद्र तसेच हवेली, भोर आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 परदानशीन मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेकरिता 14 हजार 318 बॅलेट युनिट, 5 हजार 813,कंट्रोल युनिट यंत्र, मेमरी चीप 3 हजार 968, बॅटरी 3 हजार 911 वितरित करण्यात आले आहेत.

या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याकरता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात देखील करण्यात आला आहे. पोलीस पार्टी व सर्व साहित्य आपापल्या मतदान केंद्रावर पोचल्या असून मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ही देण्यात आले आहे. मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याकरता विविध प्रकारचे जनजागृती पर कार्यक्रम देखील घेण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या शासकीय, निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँक यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!