ब्रेकिंग! ‘दिलदार’ मित्रासाठी राजकारण बाजूला ;अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांच्या तब्बल 22 प्रचारसभा रद्द..

पुणे : महाराष्ट्राचे दिलदार व्यक्तिमत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पवार कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या प्रचारसभा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका संदर्भात प्रचारार्थी होणाऱ्या 22 सभा रद्द करण्यात आल्या आहेत. बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून पाच तारखेपर्यंत प्रचार अवधी आहे. मात्र अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ही सभा घेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य निवडणूक आयोगाने ही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल केला. 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या दरम्यानच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा सारखा धडाडीचा नेता आणि सडेतोड मित्र गमावणे ही माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही,अशी खंत व्यक्त केली.
दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी कालच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या विराजमान झाल्या आहेत. सुनेत्रा पवारांकडे अर्थ वगळता इतर खाती देण्यात आली आहेत. दिवंगत अजित पवार यांच्याकडे असणारी उत्पादन शुल्क क्रीडा व युवकल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ ही तीन खाती सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आली आहेत.
