मोठी बातमी ! मोस्ट वान्टेड खालिस्तानवादी अमृतपाल सिंगला अखेर अटक , दोन महिन्यांनी पंजाब पोलिसांनी अटक करण्यात यश…!

अमृतसर : वेगळ्या खालिस्तानसाठी हिंसक आंदोलनाने पोलिस ठाण्यावर हल्ला करुन केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा यांना धमकी देणारा अमृतपाल सिंगला अमृतसर येथून अटक केली आहे.

23 फेब्रुवारीला अमृतपासिंगने आपल्या समर्थकांना सोडविण्यासाठी थेट पोलिस ठाण्यावर हल्ला करून पाच पोलिसांना जखमी केले होते. या घटनेनंतर अमृतपालसिंग फरार असल्याने अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. पंजाब हरियाणा कोर्टानेही पोलिसांना अमृतपालला पकडण्यात अपयशी ठरत असल्याने फटकारलं होतं.

पंजाब पोलिसांनी याआधी अमृतपाल सिंगचा जवळचा सहकार पप्पलप्रीत याला अमृतसर येथून अटक केली होती. आपल्याला अमृतपालबद्दल काही माहिती नसल्याचा जबाब त्याने पोलिसांना दिला होता. अमृतपाल आत्मसमर्पण करेल की नाही याबद्दल मला काही माहिती नाही असं त्याने सांगितलं होतं. 28 मार्चला आपण वेगळे झाल्याची माहिती त्याने दिली होती.
अमृतपालने नेमकं काय केलं होतं?
23 फेब्रुवारीला अमृतपाल सिंग चर्चेत आला होता. त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी हजारो समर्थकांसह अजनाला पोलीस स्थानकावर हल्ला केला होता. यामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर त्याने काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत वेगळ्या खलिस्तानची मागणी केली होती. इतकंच नाही तर अमृतपालने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही धमकी दिली होती.
