अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण बेचव अन्….; संजय राऊतांची प्रतिक्रिया

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाली असल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण देश सुन्न झाला आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राला आणखी काय पाहावं लागणार आहे…’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया देतअजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण बेचव अन् अळणी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती आल्यानंतर प्रार्थना करत होतो की,अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये. पण अजित पवार सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत. मात्र त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत त्यांची प्रशासनावरची पकड या गोष्टी सदैव महाराष्ट्राच्या कायम मनात राहतील.बारामती आणि त्यांचे एक नातं होतं,त्याच बारामती त्यांचं मृत्यू हा विचित्र योगायोग आहे असं राऊत म्हणाले.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. श्रद्धांजली त्यांना व्हावी लागेल असं कधी मनातही आलं नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीचा राजकारण केलं. त्यांचा असा अकाली अंत होईल असं कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं असं संजय राऊत म्हणाले.
