प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागात वनसेवेतील व पर्यावरणपूरक उपक्रमांचा गौरव.


लोणी काळभोर: भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सामाजिक वनीकरण विभाग, सांळुंखे विहार नरेन, हिल्स फॉरेस्ट कॉलनी येथे अपुर्व उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण विवेक खांडकेर तसेच अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) डब्ल्यू. आय. यॉटबॉन (पुणे), मयूर बोठे, विभागीय वन अधिकारी महेश खोरे, विभागीय वन अधिकारी आशा भोंग, दीपक पवार, सहाय्यक वनसंरक्षक तसेच सामाजिक वनीकरण विभाग, पुणे येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

विविध संवर्गांतील प्रथम क्रमांक पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे – संवर्गनिहाय प्रथम क्रमांक पुरस्कारप्राप्त

विभागीय वन अधिकारी संवर्ग: कीर्ती अशोक जमदाडे/कोकाटे – विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, छत्रपती संभाजीनगर

सहाय्यक वनरक्षक संवर्ग : ऋतुजा गणपत लटके – सहाय्यक वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, नाशिक

वनपरिक्षेत्र अधिकारी संवर्ग : हिरालाल रमेश चौधरी – वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, इगतपुरी

वनपाल संवर्ग : गोविंद अशोक वैद्य – वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, पैठण

वनरक्षक संवर्ग : रमेश गणपत खरमाळे – वनरक्षक, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जुन्नर

वन क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल-निखिल छगन धाने – वनरक्षक, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, अलिबाग

‘राष्ट्रीय हरित सेना शाळा’ उपक्रमांतर्गत पंचतारांकित हरित सेना शाळा पुरस्कार

सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून ‘राष्ट्रीय हरित सेना शाळा’ या उपक्रमांतर्गत राज्यभरातील माध्यमिक शाळांमध्ये ‘ इको क्लब’ स्थापन करण्यात आले आहेत. या इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता, जैवविविधता संरक्षण व जनजागृती विषयक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळांचे मूल्यमापन करण्यात आले.

या मूल्यमापनाच्या आधारे विभागस्तरीय, वृत्तस्तरीय तसेच राज्यस्तरीय पातळीवर ‘पंचतारांकित हरित सेना शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

विभागस्तरीय प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळा –
१)न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बु., ता. जुन्नर, जि. पुणे
२)श्रीमती बबनराव टाकळकर माध्यमिक आश्रमशाळा, निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर, जि. पुणे
३)गणबा सोपानराव मोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, येवड, ता. हवेली, जि. पुणे

वृत्तस्तरीय प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळा
१) न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बु., ता. जुन्नर, जि. पुणे (पुणे वृत्त)
२) संत सावता माळी हायस्कूल, अरण, जि. सोलापूर (सोलापूर वृत्त)
३) बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे, ता. वाई, जि. सातारा (सातारा वृत्त)

राज्यस्तरीय प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळा
१) जिल्हा परिषद प्रशाला, बहिरगाव, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर
२)कर्मचारी आदर्श मो. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर, जि. धुळे
३) न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मान्यवरांनी सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक करत, हरित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी शाळा, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!