लाडक्या बहिणींचे e-KYC नंतरही पैसे अडकले; मंत्री आदिती तटकरेनीं दिले तातडीचे आदेश…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई- केवायसी पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा न झाल्याने वातावरण तापले आहे.या बहिणींना दोन महिन्यांपासून आर्थिक लाभ मिळालेला नाही. आता लाडक्या बहिणींना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी तात्काळ पडताळणीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून दिले जातात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळालाच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारी महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश दिले आहेत. मात्र, हा आदेश अद्याप महिला बालकल्याण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
योजनेसाठी आवश्यक असलेली ही केवायसी प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 च्या मदतीपूर्वी पूर्ण करूनही अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. तांत्रिक गोंधळ आणि अर्जामधील त्रुटीमुळे हा अडथळा निर्माण झाला असल्याच समोर आल आहे.

या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी पडताळणीचा दुसरा टप्पा म्हणून ‘ई-केवायसी’ बंधनकारक करण्यात आले. ई-केवायसी करताना ‘ओटीपी’ येत नसल्याचे आढळले. त्यावर घटस्फोट अथवा पती किंवा पिता निधनाचे प्रमाणपत्र जोडण्याची सक्ती करण्यात आली आहे.त्यातून राज्यभरातून अनेक महिला लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांना अनुदान बंद करण्यात आले. त्यामुळे लाडक्या बहिणीने संताप व्यक्त केला. त्यानंतर आता मंत्री तटकरेंनी दिलेल्या आदेशामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
