राज्यातील ७ जिल्ह्यांवर संकट! हवामान खात्याचा मोठा इशारा, अवकाळी पावसासोबत ‘या’ संकटाची भीती…


पुणे : हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात पाऊस कायम असेल. मात्र, जानेवारी महिन्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय.

तसेच १ जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वातावरणात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. पण राज्यातील गारठा कमी झाला. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ज्यामुळे तापमान वाढत आहे.

अशातच आता भारतीय हवामान विभागाने आता काही जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला असून ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जानेवारी महिन्यात थंडीचा जोर कमी होत असून वातावरण अधिक दमट होत चालले आहे.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांत थंडी ओसरल्याचे चित्र आहे. किमान तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली असून कमाल तापमानातही बदल नोंदवण्यात आला आहे. परिणामी सकाळी थंडी कमी आणि दुपारी उकाडा अधिक जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी शहरात कडाक्याची थंडी जाणवत होती, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

ढगाळ वातावरणामुळे शहरासह उपनगरांमध्ये दमट हवामान जाणवत असून नागरिकांना घामाघूम करणारी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. तापमान ११ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने थंडी जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार , राज्यातील धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!