सोनं पुन्हा कडाडलं; पण चांदी ग्राहकांसाठी खूशखबर! जाणून घ्या आजचे दर…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली असून, त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात घट झाल्याने चांदी घेणाऱ्यांसाठी मात्र दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात झालेली ही वाढ अनेकांसाठी धक्का मानली जात आहे. लग्नसराई, गुंतवणूक आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी सोन्याकडे पाहणाऱ्या ग्राहकांना आज जास्तीची रक्कम मोजावी लागत आहे. मात्र याचवेळी चांदीचे दर घसरल्याने चांदी खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

शुक्रवारी, 9 जानेवारी 2026 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी आता 1,38,710 रुपये मोजावे लागत आहेत, जे कालपर्यंत 1,38,000 रुपये होते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली आणि बारामती या सर्व ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर समान असून प्रति 10 ग्रॅम 1,38,710 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत सर्वच शहरांमध्ये दरात स्पष्ट वाढ दिसून येत आहे, त्यामुळे शहरी भागातील ग्राहकांवर याचा थेट परिणाम होत आहे.

तसेच 22 कॅरेट सोन्याच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर आता 1,27,150 रुपये इतका झाला असून, कालच्या तुलनेत यात 650 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही वाढ विशेषतः जाणवणारी आहे.

दरम्यान, 18 कॅरेट सोन्याचाही दर वाढीच्या मार्गावर आहे. 10 ग्रॅमसाठी आता 1,04,030 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र सोन्याच्या या सर्व वाढीच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरात घट झाली असून, सध्या चांदीचा दर 2,49,000 रुपये प्रति किलो इतका आहे. त्यामुळे गुंतवणूक किंवा वापरासाठी चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही संधी लॉटरीसारखी ठरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!