मराठवाड्यात मोठी खळबळ, निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात मोठा बदल….


पुणे : राज्याच्या राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय समीकरण जुळवण्याची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मराठवाडा विभागातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मोठे फेरबदल केले.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेते, आमदार आणि खासदारांची जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अनुभवी नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संपर्कप्रमुखांना निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातच थांबून काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दरम्यान, या नियुक्त्यांमधून पक्षाने आगामी निवडणुका किती गंभीरपणे घेतल्या आहेत, हे स्पष्ट होते.

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शनिवारी राज्यातील एकूण ४० ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुखपदांची घोषणा केली. यात आगामी नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत पक्षाला मजबूत आणि पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगर- विलास पारकर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण- अर्जुन खोतकर, जालना- अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर.

बीड- टी. पी. मुंडे, मनोज शिंदे, धाराशिव- राजन साळवी, नांदेडः सिद्धराम म्हेत्रे, लातूर- किशोर दराडे, परभणी- आनंद जाधव, हिंगोली- हेमंत पाटील. आगामी निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली असून जोरदार तयारी केली जात आहे. संपर्कप्रमुखपदांची फक्त यादीत नाही तर त्यांनी स्पष्टपणे निवडणुका होईपर्यंत जिल्हे न सोडण्याची आदेश देण्यात आली आहेत. आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!