ठाकरेंना मोठा धक्का ; ऐन निवडणुकीत’ या ‘बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. ऐन निवडणुकीत ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.वाशिम जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा देताना ठेंगडे यांनी धक्कादायक असे आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वाशिम जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते वाशिमची नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होते. आता ऐन निवडणुकीत त्यांनी वाशिमच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यासाठी आलेला एबी फॉर्म जिल्हाप्रमुखांनी स्वतःच्या पत्नी रेखा मापारी यांच्या अर्जाला जोडला आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी वाशिम नगरपरिषदेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
दरम्यान निवडणुका तोंडावर असताना नाराज ठेंगडे यांनी उपजिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन थेट अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता वाशिममध्ये ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. ठेंगडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याने आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रेखा मापारी यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
