लाडक्या बहिणींना दिलासा; योजनेतून नाव कमी होणार नाही अन अपूर्ण केवायसी बाबतही स्वतंत्र निर्णय….

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. महायुती सरकार सत्तेत आणण्यात या योजनेचा मोठा मोलाचा वाटा ठरला आहे. आता या योजनेसाठी पात्र नसताना देखील अनेक महिला या योजनेचा लाभ घेतल्याच समोर आल. यानंतर सरकारकडून केवायसी बंधनकारक करण्यात आली. त्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर आता सरकारने लाडक्या बहिणीसाठी दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीचे नाव कमीही होणार नाही आणि सरकारकडून केवायसीला मुदत वाढ देण्याचा निर्णयही घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फडणवीस सरकारची एक महत्त्वाची योजना असून या योजनेबाबत सरकारने नुकतेच दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. या योजनेच्या पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो.जुलै 2024 पासून या योजनेचा लाभ मिळत असून 16 हफ्ते मिळाले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपन्न झाल्यात की 17 वा हप्ता देखील मिळणार आहे.खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांना ऑक्टोबर महिन्याचा लाभ देण्यात आला असून महिला आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू असून या आचारसंहिता कालावधीत लाडक्या बहिणींना लाभ देता येणार नाही. तर दुसरीकडे लाडकी बहिण योजनेसाठी आता केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.केवायसी केल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही. केवायसी साठी फडणवीस सरकारने 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे.हीच बाब लक्षात घेऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेच्या बाबत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात महिलांचा रोष ओढवणे सरकारला परवडणार नसल्याने महायुती सरकारकडून केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करताना महिलांना काही अडचणी येत आहेत. ज्या महिलांचे पती किंवा वडील हायात नाहीत त्यांना आधार कार्ड प्रामाणित करता येत नाही. यामुळे त्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती.दरम्यान आता अशाच महिलांसाठी सरकारकडून वेबसाईट मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. या महिलांना आता सरकारने स्वतःचे आधार कार्ड प्रमाणित करून अपूर्ण एकेवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना महिलांना अडचणी येत आहेत. ज्या महिलांचे पती किंवा वडील हायात नाहीत त्यांना आधार कार्ड प्रामाणित करता येत नाही. यामुळे त्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती.18 नोव्हेंबर पर्यंत अशा महिलांना अपूर्ण केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे. मात्र नंतर मग अपूर्ण केव्हायसी पूर्ण करण्याबाबत सरकारकडून स्वातंत्र निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे.