धाराशिव-पुणे बस मध्यरात्री इंदापूर स्थानकात आली अन्…, क्षणात जळून झाली खाक, बसमध्ये ५० प्रवासी होते…

इंदापूर : इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक उभ्या राहिलेल्या एसटीला आग लागली आणि काही समजायच्या आत या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली आहे. बस स्थानकावर मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास उभ्या असलेल्या एसटी बसला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र बसची घटना घडली, त्यावेळी बसमध्ये ५० प्रवासी होते. धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक ११ वर आली आहे.
याच वेळी इंधन गळतीमुळे या बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला.

तात्काळ अग्निशामक बोलावून ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीत बसचा पूर्ण नुकसान झाले आहे. इंदापूर बस स्थानकात मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घटना घडली आहे, एसटीत 50 प्रवासी होते, सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही.