महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदललं ; केंद्र सरकारची अखेर मान्यता,इस्लामपूर नाहीतर..


पुणे : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून आता ‘ईश्वरपूर’ असं ठेवण्यात आलं आहे. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी इस्लामपूर शहराचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची घोषणा केली. मंत्रिमंडाने या प्रस्तावाला मान्यता दिली त्यानंतर आता केंद्र सरकारने ही याला मान्यता दिली असून शहराचे अधिकृत नाव ईश्वरपूर असं करण्यात आल आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. छाननी आणि जागेची पडताळणी केल्यानंतर भारतीय सर्वेक्षण संस्थेनं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. इस्लामपूर नगर परिषदेनं 4 जून 2025 रोजी शहराचं नाव ‘ईश्वरपूर’ असं बदलण्याचा ठराव मंजूर केला. तर सांगलीचे वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक आणि मध्य रेल्वेचे मिरजेचे सहाय्यक विभागीय अभियंता यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा देणारं ना हरकत प्रमाणपत्र जारी केलं आहेहा निर्णय सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दरम्यान इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर केल्याचा हा बदल प्रादेशिक संस्कृतीचा आणि पारंपरिक ओळखीचा आदर करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचं स्थानिकांचं मत आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक सर्वेक्षक तुषार वैश यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिलं आहे. लवकरच राजपत्र अधिसूचना जारी करण्याची विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. तर गृह मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण महासंचालक कार्यालय, पश्चिम क्षेत्र, जयपूर आणि पुणे संचालनालयालाही माहिती पाठवण्यात आली आहे.या निर्णयामुळे आता इस्लामपूर शहर हे ईश्वरपूर म्हणून ओळखलं जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!