पत्नीच्या चारित्र्यावर संशय; नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा ओढणीनं गळा घोटला, पुण्यातील घटनेने खळबळ..

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पती सामाजिक कार्यकर्ता होता तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे. नकुल भोईर ४० वर्षीय असं खून झालेल्या सामजिक कार्यकर्त्याच नाव आहे.

पोलिसांनी त्याची २८ वर्षीय पत्नी चैताली नकुल भोईर हिला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नकुल भोईर हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

काल सायंकाळी देखील दोघांत वाद झाला होता, रात्री देखील नकुलचा आणि पत्नीचा वाद झाला त्या वादात नकुलच्या पत्नीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नकुल भोईर आपली पत्नी चैताली हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. या कारणावरून दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. आज पहाटे पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वादाच्या भरात संतापलेल्या चैतालीने घरातील कपड्याने पतीचा गळा आवळून खून केला. घटनेच्या वेळी दोघांची दोन आणि पाच वर्षांची मुलं घराच्या आत झोपलेली होती. त्यावेळी बाहेरच्या खोलीत ही संपूर्ण घटना घडली.
नकुल आणि चैताली दोघे मिळून साडी सेंटर चालवत होते. चैतालीला भविष्यात नगरसेविका व्हायचे होते. ती समाजसेवेमध्येही सक्रिय होती. मात्र पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून तिने त्याचा जीव घेतला, ही गोष्ट अनेकांना हादरवून टाकणारी ठरली आहे.
