विरोधकांना मोठा धक्का ; निवडणूक आयोगाने’ ते ‘ आरोप फेटाळले,दिला तपशीलवार खुलासा…


पुणे : आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर विरोधकांनी मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने विरोधकांना मोठा धक्का देत त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राजे निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर कांदिवली पूर्व मतदार संघात मतदारांचे वय अयोग्य दाखवण्यात आल्याचे विरोधकांनी म्हटले होते. दीपक कदम यांचे वय 117 दाखवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर निवडणूक आयोगाने उत्तर देत कदम यांचे वय 117 नव्हे तर 54 वर्ष असल्याचे म्हटले आहे. तसेच इतर मतदारांची नोंदणीही कायदेशीर पद्धतीने झाल्याचे आयोगाने म्हटलं आहे.तसेच एक जुलै 2025 पर्यंत अद्यावत केलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाला दिली असून ही हरकतींसाठी प्रसिद्ध केली आहे. 16 जुलै 2025 रोजी च्या आदेशानुसार दुबार नावावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त बूथ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम सुरु आहे. पक्षाने बूथ एजंट नेमावेत असंही आयोगाने म्हटलं आहे.

दरम्यान आयोगान असं देखील स्पष्टीकरण दिल आहे की,. मतदार नोंदणी, नाव वगळणं किंवा दुरुस्ती केवळ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांद्वारे केली जाते. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यात हस्तक्षेप करू शकत नाहीत. मतदार नोंदणीसाठी आयोगाचे सुरक्षित पोर्टल वापरण्यात येते. नवीन ठिकाणी नोंदणी झाल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणांची नावे वगळणे विहीत प्रक्रियेने होते. या प्रक्रियेला वेळ लागतो, त्यामुळे काही काळासाठी एकच नाव दोन ठिकाणी दिसू शकतं, अस आयोगाने म्हटले आहे.त्यामुळे आता विरोधक मतदार याद्यांच्या बाबतीत आगामी काळात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!