लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! ‘या ‘योजनेतून मिळणार 7000 हजार रुपये, कोणाला मिळणार लाभ?

पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेनंतर सरकार महिलांसाठी विविध घोषणा जाहीर करत आहे.या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने महिलांसाठी एक मोठी योजना जाहीर केली आहे. ‘विमा सखी योजना-2025’ या योजनेद्वारे महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्याचबरोबर एक निश्चित मासिक मानधन आणि कमिशन मिळणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना भारतीय जीवन विमा निगम सोबत जोडले जाणार आहे. त्या एलआयसीच्या प्रतिनिधी म्हणून काम करू शकतात.महिलांना विमा योजना ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या असतील.नवीन ग्राहक जोडणे, त्यांना माहिती देणे, पॉलिसीची नोंदणी करणे अशा जबाबदाऱ्या या महिलांकडे असतील.
या कामातून महिलांना एक निश्चित मानधन आणि त्यासोबत कमिशन व बोनस मिळेल.विशेष म्हणजे हे काम घरबसल्या, आपल्या वेळेनुसार करता येणार आहे.

या योजनेत महिलांना पहिल्या तीन वर्षांसाठी निश्चित मानधन दिले जाणार आहे.
पहिले वर्ष – दरमहा ₹७,००० (वर्षाला एकूण ₹८४,०००)
दुसरे वर्ष – दरमहा ₹६,००० (वर्षाला एकूण ₹७२,०००)
तिसरे वर्ष – दरमहा ₹५,००० (वर्षाला एकूण ₹६०,०००)

यासोबतच, कामगिरीनुसार महिलांना कमिशन आणि बोनस देखील दिला जाणार आहे.. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना वर्षाच्या शेवटी ₹४८,००० पर्यंत बोनस मिळू शकतो. त्यामुळे एकूण कमाई महिन्याला ₹७,००० पेक्षा जास्त होऊ शकते. या योजनेचा महिलांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
