धक्कादायक! कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, 3 जण गंभीर जखमी


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता कल्याणमध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर कार्यालयासमोर सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेले होते, ते मध्यस्थी करत होते. जखमी झालेल्या इसमाला ते रुग्णालयात घेऊन जात होते, मात्र तेवढ्यातच त्यांच्या गाडीवर जोरदार हल्ला करण्यात आला. गाडीची तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांनी बोरगांवकर व इतर दोघांना जबर मारहाण केली.या घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी माजी नगरसेवकाची तक्रार नोंदवून घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान या हल्ल्यात एकाची प्रकृती गंभीर आहे.या हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र, ज्ञानेश्वर सपाट हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.माजी नगरसेवकावर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!