स्वारगेट पुन्हा हादरलं ; 46 वर्षीय क्लास चालकाचं विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन, आरोपीस बेड्या….

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वारंवार येत असल्याच दिसून येत आहे.या भागात खासगी शिकवणी चालवत असलेल्या एका 46 वर्षीय क्लास चालकांन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेश दौलत रौंदळ, (वय ४६ वर्ष, रा. गौरव राज बिल्डिंग, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज,) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.तो स्वारगेट भागात खासगी शिकवणी चालवतो. गुरुवार नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास वर्गात संबंधित विद्यार्थिनी एकटीच असताना रौंदळने तिच्याशी संवाद साधला.‘तू शिकवणी वर्गात आल्यापासून मला आवडतेस. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुला माझ्या शाळेत नोकरी देईन व सोन्याची अंगठी देईन,’ असे सांगून त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.

घाबरलेल्या मुलगीने झालेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. स्वारगेट पोलिसांनी तत्काळ कारवाई करून रौंदळ याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

