बँक खात्यात पैसे नसले तरी पेमेंट करता येणार, आता रिझर्व्ह बँकेचा नवीन प्लॅन…!

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या एका योजनेमुळे सध्या तुमचा फायदा होणार आहे. यामध्ये तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही प्री-सेक्शन क्रेडिट लाइनद्वारे UPI वरून पैसे देऊ शकता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या.

यामध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे बँकांमध्ये प्री-सेक्शन क्रेडिट लाइन ऑपरेट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही अशी प्रणाली आहे की तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही पेमेंट करू शकाल. मात्र, तुम्हाला तुमचे खाते यूपीआयशी (UPI) लिंक करणे आवश्यक आहे.

याबाबत शक्तिकांत दास म्हणाले की, या नवीन प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन मिळेल. यूपीआयने भारतातील पेमेंटची पद्धत बदलली आहे. वेळोवेळी उत्पादने आणि वैशिष्ट्ये विकसित करण्यासाठी यूपीआय मजबूत करण्यासाठी विविध पावले उचलली गेली आहेत.
तसेच रुपे क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या याचा लाभ अनेकजण घेण्याची शक्यता आहे.