….. तर लाडक्या बहिणीचे 1500 रुपये बंद होणार ; ekyc बाबत घ्या ‘ही ‘काळजी

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवनवीन अपडेट समोर येत आहे. या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी आता वडील अथवा पतीचे आधार कार्ड सुद्धा आवश्यक आहे,नाहीतर योजनेचा हप्ता बंद होणार आहे. पात्र लाभार्थ्यांनाच नियमितपणे मासिक 1500 रुपयांचा हप्ता मिळेल. ही प्रक्रिया पूर्ण झाली नाहीतर हप्ता बंद होण्याची शक्यता आहे.

मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसी करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. पण सध्या वेबसाईट क्रॅश होत असल्याची तक्रार वाढल्या आहेत. त्यामुळे बहिणी नाराज झाल्या आहेत.
काय आहे प्रक्रिया?

लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्या
लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
तुमचा आधार क्रमांक नोंदवा
आता कॅप्चा कोड तिथे नोंदवा
आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करा
आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद करून Submit करा
*आता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे –
नवीन नियमानुसार पती, वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP नमुद करा
आता लाभार्थी लाडक्या बहिणीचा जात प्रवर्ग निवडा
आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर क्लिक करा
आता संपूर्ण माहिती एकदा वाचा. सबमिट बटन क्लिक करा.
e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.
*या प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड
शिधापत्रिका, रेशन कार्ड क्रमांक
वार्षिक 2.50 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र
आधिवास प्रमाणपत्र,रहिवाशी प्रमाणपत्र,डोमिसाईल
बँक खात्याची सविस्तर माहिती
दरम्यान या लाडक्या बहिणीसाठी आता सरकारने मोठा निर्णय घेत पात्र लाभार्थी महिलेला एक लाखापर्यंतचे कर्ज 0% व्याजदराने देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल आहे. सध्या मुंबई बँकेने तीन सप्टेंबर पासून कर्जपुरवठा सुरू केला आहे.