मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय ; नवी मुंबई विमानतळाला आता लोकनेते दि.बा.पाटील याचं नाव.

मुंबई : गेल्या काही दिवसापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली जात होती. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांच नाव दिलं जाणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांच नाव देण्यासाठी अनेक वर्षापासून मागणी होत होती.पण यावर कोणताच काढला जात नव्हती.पण अखेर आता याबाबत निर्णय़ घेण्यात आला आहे. दि बा पाटील यांच्या नावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली होती. या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राज्याने सुचवलेल्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं.तसेच दि बा पाटील यांच्या व्यतिरीक्त इतर कोणाच ही नाव विचारात नव्हतं. त्यामुळे अखेर दि बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीय याबाबत निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांच नाव दिलं जाणार आहे.
कोण आहेत दि. बा. पाटील?

दि. बा. पाटील यांचे पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील. त्यांचा जन्म उरण तालुक्यातील जासई येथे 13 जानेवारी 1926 रोजी झाला. ते पेशाने वकील होते. तर त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. पनवेलचे नगराध्यक्ष, चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शेतकरी कामगार पक्षातून झाली होती. त्यांनी शेतकऱ्यांची अनेक आंदोलने उभारली. प्रसंगी तुरुंगवासही भोगला. शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. नवी मुंबईतील अनेक विकास कामात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी अनेक नेते आणि कार्यकर्तेही घडवले आहेत.