मुंबई -पुणे महामार्गावर हायवे चालकाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, मोटरसायकलचा चक्काचूर….


पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या हायवेच्या धडकेत मोटारसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर हायवे चालक वाहनासह पसार झाला आहे. पोलिसांकडून वाहन चालकाचा तपास करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश चंद्रकांत दोडमणे अस मृत तरुणाचं नाव आहे. तो आपल्या दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या अज्ञात हायवे चालकाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याच्या पोटाला व हाताला गंभीर दुखापत झाली. धडक इतकी भयंकर होती की तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलचाही चक्काचूर झाला आहे. बिबेवाडीमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ कुमार जयभीम दोडमणे (वय 28, रा. शिवतेजनगर, बिबेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात हायवा चालकाने निष्काळजीपणे, अविचाराने व भरधाव वेगात वाहन चालवून अपघात घडवला म्हणून गुन्हा झाला आहे. या घटनेवरून वडगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 270/2025 भा.दं.सं. कलम 281, 125 (ब), 106, 324 (4), मो.वा.का. कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!