मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेससह 15 पक्षांना दणका ; पक्षाची मान्यता रद्द होणार..


पुणे : आगामी होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत राजकीय पक्षांना चांगलाच दणका दिला आहे. राज्यातील नोंदणीकृत परंतु राजकीय दृष्ट्या पूर्ण निष्क्रिय अवस्थेत पोहोचलेल्या किमान 15 राजकीय पक्षांना आयोगाने नोटीस बजावली आहे. यात राष्ट्रवादी पक्षाचाही समावेश आहे. याचबरोबर आयोगाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडण्याचे आदेश देखील दिले आहेत.

बिहार राज्यात नोंदणी करत असलेले परंतु 2019 पासून कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत भाग न घेतलेले 15 पक्ष आहेत. मागील सहा वर्षांपासून हे पक्ष निष्क्रिय आहेत. कुठल्याही निवडणुकीत या पक्षाने भाग घेतला नसल्याकारणाने निवडणूक आयोगाने ही कडक भूमिका घेतली आहे.त्यामुळे बिहार निवडणुकी तोंडावर येऊन ठेपल्या असताना हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे.

लोकप्रतिनिधी कायदा 1951अंतर्गत सूचिवबद्ध पक्षांना अनेक सुविधा दिल्या जातात. परंतु सतत निष्क्रिय राहिल्यास त्यांची मान्यता आणि कायदे देखील काढून घेतले जातात. गेल्या महिन्यात ही आयोगाने बिहारमधील अनेक निष्क्रिय पक्षांना यादीतून वगळले होते त्यानंतर आता या 15 पक्षांच्या भविष्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने नोटीस पाठवलेल्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ही समावेश आहे पण ही राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील राष्ट्रवादी नसून बिहारमध्ये नोंदणी केलेला दुसराच पक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. आता या आयोगाच्या आदेशावर राजकीय पक्ष काय भूमिका मांडतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

या पक्षामध्ये भारतीय अवाम कार्यकर्ता पार्टी,भारतीय जागरण पार्टी, भारतीय युवा जनशक्ती पार्टी, एकता विकास महासभा पार्टी, गरीब जनता दल, जय जनता पार्टी, जनता दल हिंदुस्तानी , लोकतंत्रिक जनता पार्टी, मिथिल्लांचं राष्ट्रवादी पार्टी, राष्ट्रीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय सद्भावना पार्टी, वसुदेव कुटुंबंकम पार्टी, वसुंधरा जनविकास दल आणि यंग इंडिया पार्टी या पक्षांचा समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!