धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान बायकोला सस्पेन्स सांगणं पडलं महागात..; काय आहे प्रकरण?


पुणे : सध्या ‘द कॉन्ज्युरिंग – लास्ट रीट्स’ हा हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मात्र पुण्यात या चित्रपटाच्या स्क्रिनींग दरम्यान मारामारी झाल्याची घटना घडली आहे. हा चित्रपट पाहत असताना एक व्यक्ती आपल्या बायकोला सस्पेन्स सांगत असताना आजूबाजूच्या प्रेक्षकांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रेक्षकाने त्यांना शांत राहण्यास सांगितल्याने त्या दोघांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका मल्टीप्लेक्समध्ये ‘द कॉन्ज्युरिंग – लास्ट रीट्स’ हा हॉरर चित्रपट दाखवला जात होता. स्क्रीनिंग दरम्यान एका व्यक्तीने आपल्या बायकोला चित्रपटात पुढे घडणाऱ्या घटनांबद्दल सांगत होता. त्यामुळे आजूबाजूच्या प्रेक्षकांना त्रास होत होता. संतप्त झालेल्या एका प्रेक्षकाने संतापाच्या भरात तक्रारदाराशी उर्मटपणे बोलणे सुरू केले. काही वेळातच वाद वाढला आणि आरोपीने तक्रारदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.यां घटनेनंतर तक्रारदारास किरकोळ दुखापत झाली असून त्याने तत्काळ चिंचवड पोलिस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ११७ (सार्वजनिकरित्या गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे), कलम ११५ (प्रेरणा देणे), कलम ३५२ (हल्ला) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!